

पुढारी वृत्तसेवा :
देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून नवीन आर्थिक धोरण सादर केले. या धोरणामुळे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले. त्या वेळी ते म्हणाले होते "ज्याची वेळ आली आहे अशा कल्पनेला पृथ्वीवरील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही."
डॉ. सिंग यांनी परवाना राज मोडीत काढले, व्यापारातील अडथळे कमी केले आणि भारताची अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीसाठी खुली केली, सोव्हिएत शैलीतील नियोजित अर्थव्यवस्थेतून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे देश वळवला.
डॉ. मनमोहन सिंग यांनी महत्त्वाच्या सुधारणांमध्ये रुपयाचे अवमूल्यन होऊ नये म्हणून तसेच विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादांचे उदारीकरण आणि आर्थिक काटकसरीसंबंधी उपाय केले.
डॉ. सिंग यांनी धोरणाने भारताच्या बँकिंग क्षेत्राचे आणि वित्तीय बाजारांचे आधुनिकीकरण केले, त्यामुळे जागतिक भांडवल देशाकडे आकर्षित केले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुधारणांमुळे औद्योगिक विकास आणि आर्थिक धोरणाच्या नव्या युगाची निर्मिती झाली. या परिवर्तनावर व्यक्त होताना त्यांनी नंतर टिप्पणी केली होती की, "विकासाची प्रक्रिया ही लोकांच्या क्षमता हळूहळू उलगडत जाते."