'ते दोघे शाळकरी मुलांसारख भांडतायत'

इराण-इस्रायल संघर्षावर ट्रम्‍प यांचे अजब विधान
Donald Trump
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि.२) इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची तुलना शाळकरी मुलांच्‍या भांडणाशी केली. तसेच मध्यपूर्वेतील परिस्थितीवर अमेरिकेचे लक्ष असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हे एक भयंकर युद्ध

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प माध्‍यमांशी बाेलताना म्हणाले की,"इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्ष खरोखर खूप वाईट आहे; शाळेच्या अंगणातल्या दोन मुलांमधला हाणामारीसारखा विचार करा. काहीवेळा आपल्याला फक्त ते सोडावे लागेल. पुढे काय होते ते पाहू. हे एक भयंकर युद्ध आहे आणि आज काय होत आहे ते तुम्ही पाहू शकता. ते कुठे थांबणार आहे माहीत आहे का?, असा सवाल करत इराणने आज सुमारे 200 रॉकेट इस्‍त्रायलवर डागले. आता मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षात आम्ही स्पष्टपणे सहभागी होणार आहोत."

जग जागतिक आपत्तीच्या जवळ

इराणने इस्रायलवर केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर टीका केली. त्यांनी या परिस्थितीचे वर्णन 'जागतिक आपत्तीच्या जवळ' असे केले आहे. ते म्‍हणाले की, "जग सध्या नियंत्रणाबाहेर जात आहे. काही काळापूर्वी, इराणने इस्रायलवर 200 पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. आम्ही जागतिक आपत्तीच्या एक पाऊल जवळ आलो आहोत. आमच्याकडे अस्तित्वात नसलेले अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती आहेत जे प्रभारी असले पाहिजेत, परंतु ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधी उभारणीच्या कार्यक्रमांना जात आहेत. सध्या अमेरिकेत प्रभारी कोणीही नाही आणि जो बायडेन आणि कमला हॅरिस अधिक गोंधळलेले आहेत, अशी टीकाही त्‍यांनी केली.

ते आपल्याला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहेत

मी अध्यक्ष असताना इराणकडे पैसे नव्हते, आता त्यांच्याकडे $300 अब्ज आहेत,असा दावा ट्रम्प यांनी केला. मी अमेरिकेचा राष्‍ट्राध्‍यक्ष असताना मध्यपूर्वेत युद्ध नव्हते, युरोपात युद्ध नव्हते आणि आशियामध्ये संघर्ष नव्‍हता.महागाई नव्हती. अफगाणिस्तानमध्‍ये कोणतीही आपत्ती नव्हती. सगळीकडे शांतता होती. युद्ध असो वा युद्धाचा धोका सर्वत्र आहे आणि आपला देश दोन अक्षम लोक चालवत आहेत. हे आपल्याला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहेत, असा आरोपही त्‍यांनी बायडेन आणि कमला हॅरिस यांच्‍यावर केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news