CM Devendra Fadnavis | मिसिंग लिंकमुळे 70 हजार कोटींच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती

लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
CM Devendra Fadnavis |
मुंबई : मुंबई-पुणे मिसिंग लिंक लोकार्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व इतर.
Published on
Updated on

मुंबई : मुंबई-पुणे मिसिंग लिंक आता मिसिंग राहिलेला नाही. तो मुंबई आणि पुणे यांना जोडत असल्याने यापुढे कनेक्टिंग लिंक म्हणून ओळखला जाईल. कनेक्टिंग लिंकसाठी 7 हजार कोटी रुपये खर्च झाले असले, तरीही या रस्त्यामुळे 70 हजार कोटींची अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट या 13.3 कि.मी.च्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा असल्याने त्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. भारतातील जमिनीवरील सर्वात उंच 180 मीटर उंचीचा केबल स्टेड पूल या प्रकल्पात आहे.

यापूर्वीच्या सरकारने मिसिंग लिंक न बांधण्यासाठी 13 कारणे दिली होती. लोणावळा तलावाच्या खालून हा पूल जाणे, हे मुख्य कारण होते. जुन्या सरकारचा निर्णय मागे घेऊन आम्ही हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या पथकराच्या साहाय्याने मिसिंग लिंक प्रकल्प स्वयंअर्थसाहाय्यित केला. हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी आव्हान होते. यात सात देशांचा हातभार लागला. प्रत्यक्ष काम अ‍ॅफकॉन आणि नवयुग या दोन भारतीय कंपन्यांनी केले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

जे होणार नाही ते करून दाखवतो. त्यालाच महायुती सरकार म्हणतात. ज्या प्रकल्पांचे आम्ही भूमिपूजन केले त्या प्रकल्पांचे आम्हीच लोकार्पण केले, असे सांगतानाच महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासाची लिंक मिसिंग होती ती आम्ही कनेक्ट केली, असे एकनाथ शिंदे म्हणाले. याच वेळी या प्रकल्पातील अजित पवार यांच्या सहभागाची आठवण सुनेत्रा पवार यांनी करून दिली. अजितदादा यांनी या रस्त्याची पाहणी केल्याचे त्या म्हणाल्या. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे, वेगाचे व आधुनिकतेचे प्रतीक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news