

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात कथित कोट्यवधी रुपयांची रक्कम जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित खटल्याची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक केली आहेत. यामध्ये भारताचे सरन्यायाधीश आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यातील पत्रव्यवहार, तसेच न्यायमूर्ती वर्मा यांच्या उत्तराचाही समावेश आहे.
सरन्यायाधीशांच्या सूचनेनुसार न्यायमूर्ती वर्मा यांच्या गेल्या सहा महिन्यांतील कॉल रेकॉर्डचा शोध घेण्यात आला. तसेच, त्यांना त्यांचा मोबाईल मधील कोणत्याही चॅट किंवा डेटा न डिलीट करण्याच्या कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण सत्य समोर यावे यासाठी न्यायपालिका व प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.