पुढारी ऑनलाईन डेस्क
जयललिता यांच्या मृत्यूनंतर राजकीय उलथापालथी होत असलेल्या तामिळनाडूमध्ये एडीएआयएमके सत्तेच्या बाहेर जाण्याची चिन्हे असून भाजपशी केलेली आघाडी त्यांच्या पथ्यावर पडलेली दिसत नाही. तर दीर्घकाळ सत्तेबाहेर राहणाऱ्या अण्णा द्रमुक ची सत्तेकडे वाटचाल सुरू झाली आहे. करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा करिष्मा तिथे दिसत असून या दोन्ही पक्षांना सत्तेकडे नेणारा कल दिसत आहे.
result LIVE : तामिळनाडूत डीएमकेची आगेकूच; केरळात डावे आणि काँग्रेसमध्ये चुरस
मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात अण्णा द्रमुकने 69 तर एआईएडीएमकेने 51जागांवर विजय मिळविला असून डीएमके 13 जागांवर आघाडीवर आहे. तसेच एआयएडीएमकेची 16 जागांवर पिछेहाट सुरू आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी आघाडीवर असून लवकरच निकाल जाहीर होतील. तामिळनाडूच्या राजकारणात कमल हसनने मक्कल निधी मैयक हा पक्षही मैदानात उतरला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील कलानुसार कमल हसन ला फारशी प्रगती करता आलेली नाही. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम, अण्णा द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन, अम्मा मक्काल मुनेत्र कझगमचे प्रमुख टी टी व्ही दिनकरण, एमएनएमचे कमल हसन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्टॅलिन यांच्या अण्णा द्रमुक आणि काँग्रेसची तर सत्ताधारी एआयएडीएमके आणि भाजपची आघाडी आहे. या निवडणुकीत २३४ जागांसाठी तब्बा ४ हजार उमेदवार रिंगणात आहेत.