India Army : 'रावळपिंडीपासून खैबर पख्तूनख्वापर्यंत...भारताच्‍या 'रेंज'मध्‍ये संपूर्ण पाकिस्तान'

लेफ्टनंट जनरल डी'कुन्हा यांनी स्‍पष्‍ट केले भारतीय लष्कराचे सामर्थ्य
India Army Air Defence
आर्मी एअर डिफेन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी'कुन्हा.ANI Photo
Published on
Updated on

India Army Air Defence : "भारतीय लष्‍कराच्‍या कवेत संपूर्ण पाकिस्‍तान आहे. या देशाच्‍या कोणत्‍याही ठिकाणांवर हल्ला करण्याची क्षमता आमच्‍यामध्‍ये आहे. पाकिस्तानी लष्कराने त्यांचे मुख्यालय रावळपिंडीहून खैबर पख्तूनख्वा सारख्या दुर्गम पर्वत रांगांत हलवले तरी आता त्यांना लपण्‍यासाठी खोल खड्डा शोधावा लागेल. गरज पडल्यास भारतीय सशस्त्र दल पाकिस्तानी हद्दीच्या घुसून प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत," अशा शब्‍दांमध्‍ये आर्मी एअर डिफेन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी'कुन्हा यांनी भारतीय लष्कराचा सामर्थ्य स्‍पष्‍ट केले.

संपूर्ण पाकिस्तान भारतीय लष्‍कराच्‍या 'रेंज'मध्ये...

वृत्तसंस्‍था 'ANI'ला दिलेलया मुलाखतीत लेफ्टनंट जनरल डी'कुन्हा म्हणाले की, " भारताकडे पाकिस्तानला उत्तर देण्‍यासाठी पुरेसे शस्त्रास्त्रे आहेत. संपूर्ण पाकिस्तान भारतीय लष्‍कराच्‍या रेंजमध्ये आहे. आम्ही आमच्या सीमेपासून किंवा अगदी खोलीपर्यं जिथे आम्ही संपूर्ण पाकिस्तानला मारू शकतो तिथे पूर्णपणे सक्षम आहोत. पाकिस्तानी लष्कराने त्यांचे जनरल मुख्यालय रावळपिंडीहून खैबर पख्तूनख्वा सारख्या भागात हलवले तरी त्यांना खोल खड्डा शोधावा लागेल. भारतीय सैन्याने स्थानिक पातळीवर विकसित तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यामध्ये लांब पल्ल्याचे ड्रोन आणि मार्गदर्शित दारूगोळा यांचा समावेश होता. ऑपरेशन सिंदूरमध्‍ये पाकिस्‍तानने याचा अनुभव घेतला आहे.

इस्रायलमधील संघर्षाने आम्हाला ड्रोनची प्रचंड क्षमता शिकवली

"रशिया-युक्रेन संघर्ष आणि काही प्रमाणात इस्रायलमधील सध्याच्या संघर्षाने आम्हाला ड्रोनची प्रचंड क्षमता शिकवली. आम्हाला जाणवले की, पाकिस्तान, तुर्की आणि कदाचित उत्तरेकडील देशांच्‍या पाठिंब्याने पाकिस्‍तानकडे भरपूर ड्रोन आहेत. प्रथम तुमच्या रडारला संतृप्त करण्यासाठी कमी उंचीचे, स्वस्त ड्रोन मोठ्या संख्येने पाठवतील आणि ते तुम्हाला तुमचे रडार उघडण्यास भाग पाडतील, हे आम्हाला अपेक्षित होते. त्‍यामुळेच २६, २७ आणि २८ तारखेला आम्ही सीमावर्ती भागात आमच्या लष्करप्रमुखांच्या आदेशानुसार सराव केला, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्‍या भ्‍याड हल्‍ल्‍यात २६ पर्यटकांचा मृत्‍यू झाला. यानंतर दोन आठवड्यांनी भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि जम्मू आणि काश्मीर ओलांडून गोळीबार केला आणि सीमेवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि रहीम यार खान एअरबेससह प्रमुख पाकिस्तानी लष्करी आणि हवाई पायाभूत सुविधांना लक्ष्य करून नष्ट केले. १० मे रोजी दोन्ही देशांमध्‍ये युद्‍मविराम करार झाला आहे. मात्र भारतीय लष्‍कर सतर्क आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news