धीरेंद्र के. ओझा यांची केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती

लवकरच स्विकारणार पीआयबीचा पदभार
Dhirendra K. Ojha appointed as the Chief Spokesperson of the Central Government
धीरेंद्र के. ओझा यांची केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्तीPudhari File photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा - भारतीय माहिती सेवा (आआयएस) अधिकारी धीरेंद्र के. ओझा यांची गुरुवारी (दि.4) केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 1990 च्या बॅचचे अधिकारी असलेले ओझा हे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) चे प्रमुख महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

या अगोदर शेफाली बी शरण हे या पदावर नियुक्त होते. शेफाली बी शरण यांची प्रसरण विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1990 च्या बॅचचे आयआयएस अधिकारी शरण यांना यावर्षी 1 एप्रिल रोजी पीआयबीच्या महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत ओझा यांनी भारतीय निवडणूक आयोगात संचालक आणि महासंचालक आणि दुबईतील विशेष वार्ताहर अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरही विविध पदांवर काम केले आहे.

Dhirendra K. Ojha appointed as the Chief Spokesperson of the Central Government
पारंपरिक व्यवसायाचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान : केंद्रिय मंत्री पीयुष गोयल

दरम्यान, धीरेंद्र के. ओझा हे सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन्स (सीबीसी) चे महासंचालक म्हणून कार्यरत होते. ओझा पीआयबीचे महासंचालक बनल्यानंतर आता वाय. के. बावेजा त्यांची जागा सीबीसीमध्ये घेतील. सीबीसी केंद्र सरकारच्या सर्व संस्थांच्या जाहिरातींवर देखरेख करते आणि माध्यम धोरणावर सरकारला सल्लागार संस्था म्हणून काम करते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news