नवी दिल्ली : नोकरी आणि रोजगाराची व्याख्या व्यापक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केले. केंद्रीय शिक्षण मंत्री, धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘नोकऱ्या तुमच्या दारी: सहा राज्यांतील तरुणांसाठी नोकऱ्यांचे निदान’ या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी सहा राज्यांवरील तपशीलवार अहवालासाठी जागतिक बँकेच्या टीमचे कौतुक केले. कौशल्य आणि नोकऱ्यांवरील अशा सखोल निदानामुळे नवीन संरचना तयार करण्यास आणि आपल्या लोकसंख्येच्या सक्षमीकरणासाठी प्रगतीशील धोरणे तयार करण्यास सक्षम होतील, असे ते म्हणाले. नोकरी आणि रोजगाराची व्याख्या व्यापक करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रधान म्हणाले की आर्थिक संधी आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून चौकट रुंदावायला हवी. धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, तांत्रिक अडथळ्यांमुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल आहे. कर्मचाऱ्यांना सतत कौशल्यविकसीत करत राहणे आवश्यक झाले आहे.
“नोकऱ्या तुमच्या दारी” अहवाल हे शिक्षण आणि भारताचा रोजगार अजेंडा यांच्यात धोरणात्मक संबंध प्रदान करण्यासाठी रोडमॅप दोन्ही म्हणून काम करेल. महाराष्ट्र ,हिमाचल प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या सहा राज्यांच्या रोजगारासंबंधीचा हा अहवाल आहे. माध्यमिक शाळांमधून पदवी मिळवणाऱ्या तरुणांसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांची आणि भूमिकांची ओळख या अहवालात करुन देण्यात आली आहे.