पुन्हा नोटाबंदी? ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा बंद करा! चंद्राबाबू नायडूंची केंद्र सरकारकडे मागणी

मुख्यमंत्री नायडू यांनी डिजिटल पेमेंट आणि तत्रज्ञानाला प्रोत्‍साहन देण्याची बाजू मांडली.
demonetisation
पुन्हा नोटाबंदी? ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा बंद करा! चंद्राबाबू नायडूंची केंद्र सरकारकडे मागणीfile photo
Published on: 
Updated on: 

demonetisation again chandrababu naidu demands demonetisation of rs 500 and rs 2000 notes

पुढारी ऑनलाईन : डिजिटल पेमेंट आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची बाजू मांडताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली भूमिका मांडली होती. आता ते पुन्हा एकदा या मागणीचा पुनरुच्चार करत आहेत.

demonetisation
Gold Rangoli : ६ किलो सोन्याची रांगोळी! सोन्याचे हार, बांगड्या अन् अंगठ्यांनी साकारली अनोखी कलाकृती

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय आणि आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोमवारी त्यांनी ५०० आणि २००० रुपयांच्या मोठ्या नोटा पूर्णपणे बंद करण्याची जोरदार मागणी केली. रोख स्वरूपातील मोठे व्यवहार थांबवले, तर देशातील भ्रष्टाचाराची मुळे नष्ट करता येतील आणि गरिबी दूर करणेही अत्यंत सोपे होईल, असा त्यांचा दावा आहे.

डिजिटल पेमेंट आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याची बाजू मांडताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली भूमिका मांडली होती. आता ते पुन्हा एकदा या मागणीचा पुनरुच्चार करत आहेत.

'फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटाच चलनात असाव्यात'

नायडू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, "डिजिटल चलनाच्या अहवालासाठी मीच सूचना दिल्या होत्या. यापूर्वीही मी पंतप्रधानांना ही व्यवस्था लागू करण्याचे आवाहन केले होते आणि आज पुन्हा तीच मागणी करत आहे. ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा पूर्णपणे रद्द करायला हव्यात. बाजारात फक्त १०० आणि २०० रुपयांच्या लहान नोटाच चलनात असाव्यात."

demonetisation
Parents Guide : ना टीव्ही, ना मोबाइल! अभिनेत्री आसिन आणि राहुल शर्मा करत आहेत मुलीचा असा सांभाळ

नोटाबंदीच्या वर्धापनदिनानंतर लगेचच हा मुद्दा उपस्थित

विशेष म्हणजे, २०१६ मधील ऐतिहासिक नोटाबंदीला १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लगेचच नायडू यांनी हे विधान केले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने रातोरात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचार संपवणे हा या निर्णयामागील उद्देश होता.

'तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचाराचे चक्रव्यूह मोडेल'

तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख नायडू म्हणाले की, व्यवस्थेतील त्रुटींमुळे भ्रष्टाचार आज एक असे चक्रव्यूह बनला आहे, ज्यातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी आपण दीर्घकाळापासून प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गरिबी दूर करणे होईल सोपे!

नायडू यांनी दावा केला, "तंत्रज्ञानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली, तर देशात संपत्ती निर्माण करणे कठीण राहणार नाही आणि गरिबी दूर करणेही अवघड जाणार नाही." डिजिटल चलन हेच भविष्य असल्याचे त्यांचे मत आहे.

नायडू यांनी निवडणुकीच्या राजकारणातही मोठे बदल करण्याची मागणी केली. निवडणुका पैशाच्या ताकदीवर नव्हे, तर समाजसेवेच्या भावनेतून लढवल्या गेल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करण्याच्या प्रकारावरही त्यांनी कठोर टीका केली.

नेत्यांची 'पैसे वसूल' करण्याची मानसिकता संपणार

निवडणुकांमध्ये वाटल्या जाणाऱ्या रोख रकमेवर निशाणा साधताना ते म्हणाले की, निवडणूक जिंकण्यासाठी जो उमेदवार कोट्यवधी रुपये खर्च करतो, त्याची सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिली धडपड तो खर्च केलेला पैसा वसूल करण्याची असते. निवडणुकीतील खर्च कमी झाल्यामुळेच नेते जनतेप्रति अधिक उत्तरदायी बनतील. एनडीए सरकारने निवडणुकांमध्ये पैशांच्या वाटपावर नियंत्रण आणून एका नव्या राजकीय संस्कृतीची सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

नायडू यांच्या मते, "जेव्हा निवडणुकीत पैसा खर्च होणे बंद होईल, तेव्हा नेत्यांमध्ये सेवाभाव वाढेल आणि 'मी पैसा खर्च केला आहे, त्यामुळे भ्रष्टाचार करून तो परत मिळवायचा' ही निकृष्ट मानसिकता कायमची संपुष्टात येईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.