Delimitation Bill New Map : मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या जागांचा नकाशा प्रसिद्ध, पहा कोणत्‍या राज्याला किती जागा!

तामिळनाडूला मिळणार ५९ जागा आणि उत्तर प्रदेशला १२० जागा मिळणार, मेघवाल यांनी प्रस्तावित जागांचा तपशील दिला
Delimitation Bill New Map
Delimitation Bill New Map
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केंद्र सरकारने देशाच्या संसदीय राजकीय नकाशातील संभाव्य बदलांचे अनावरण केले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शनिवारी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लोकसभेतील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रस्तावित जागांचा नकाशा सादर केला. यानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभेतील जागांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ होईल. या बदलामुळे लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या ८५० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नकाशा शेअर करताना मेघवाल म्हणाले की, प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना ही भारताच्या संसदीय रचनेला नव्याने आकार देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जागांमध्ये प्रस्तावित वाढीनंतर राज्यांमधील लोकसभेच्या जागांचे नवीन प्रमाण २०२१ पर्यंत कायम राहील.

Delimitation Bill New Map
Delimitation Bill : परिसीमन विधेयक लोकसभेत विचारार्थ घेण्यासाठी राष्ट्रपतींनी दिली मंजूरी!

या प्रस्तावातील सर्वात मनोरंजक बाब म्हणजे विषम संख्येने जागा असलेल्या राज्यांसाठी जागांचे वाटप. जागांची संख्या निम्मी केल्यानंतर ती पूर्णांकात कशी करायची, या प्रक्रियेबद्दल विधेयकांमध्ये तपशील दिलेला नाही. मेघवाल यांच्या योजनेनुसार, महाराष्ट्रात ४८ वरुन आता ७२ जागा होतील. तामिळनाडूच्या सध्याच्या ३९ जागा ५९, आंध्र प्रदेशच्या २५ वरून ३८, पंजाबच्या १३ वरून २० आणि तेलंगणाच्या १७ वरून २६ जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यासह इतर मोठ्या राज्यांमध्ये जागांची संख्या वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.