

Naravane Book Leak Case: माजी लष्कर प्रमुख एमएम नरवणे (निवृत्त) यांच्या प्रकाशित न झालेल्या फोर स्टार ऑफ डेस्टिनी पुस्तकातील काही अंश लीक झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत असून अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आपल्या प्राथमिक तपासात हे काम विसलब्लोअरचं वाटत नसून संरक्षण मंत्रालयाची परवानगी बायपास करण्याचा सामुहिक प्रयत्न असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तपासाबाबत अधिक माहिती देताना स्पेशल सेलने एक गुन्हेगारी स्वरूपाचं षडयंत्र असल्याचे म्हणजे एफआयआरमध्ये त्याबाबतची कलम समाविष्य केले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडिया यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. याबाबत प्रकाशकाला उत्तर देण्यास सांगितले आहे.
या तपासाचा फोकस हा युएस, कॅनडा, युके आणि ऑस्ट्रेलिया इथं प्री प्रिंट कॉपी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याच्या आरोपावर आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'सर्वात आधी पुस्तकाची लीक कॉपी ही ब्रिटीश इंडियन ओशन टेरिटोरी .io domain वर ठेवण्यात आली. त्यानंतर ही कॉपी इतर अनेक प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवण्यात आली.'
पोलीस आता लीक झालेल्या पुस्तकाचे १३ अंकी इंटरनॅशनल स्टँडर्ड बूक नंबर (ISBN) चे विश्लेषण करत आहेत. याबाबत प्रकाशकाला देखील काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
अधिकारी म्हणाले की, 'प्रकाशकांना ज्यावेळी त्यांच्या विरूद्ध FIR दाखल केल्यानंतर ट्विटरवरून वक्तव्य का प्रसिद्ध केलं. त्यांनी पुस्तक लीक झाल्या झाल्या पोलिसांकडे का तक्रार केली नाही. याबाबत देखील प्रश्न विचारले जाणार आहेत.'
पोलिसांनी सांगितलं की, पुस्तकाची पीडीएफ ही पेंग्विन रँडम हाऊस इंडियाकडून तयार केल्याचा आरोप आहे. ही पीडीएफ काही वेबसाईट आणि काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होती. या प्लॅटफॉर्मवर पूर्ण झालेल्या बूक कव्हरसह हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध होतं. दरम्यान, पेंग्विन हाऊस इंडियाने ते एकटे या पुस्तकाचे प्रकाशक असून प्रकाशनाचे संपूर्ण अधिकार हे आमच्याकडे आहेत आणि हे पुस्तक अजून कोणत्याही प्रकारात प्रकाशित करण्यात आलेलं नाहीये.