Delhi Building Fire | दिल्लीत निवासी इमारतीला भीषण आग; ३ मुलांसह ९ जणांचा होरपळून मृत्यू

Delhi Building Fire | १० जणांचा बचाव करण्‍यात यश, ३० अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना
Delhi Building Fire
प्रतीकात्मक छायाचित्रPudhari Photo
Published on
Updated on

Delhi Building Fire

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पालम भागात आज (दि. १८) सकाळी एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

आगीच्‍या दुर्घटनेनंतर दोघांनी मारल्‍या इमारतीवरुन उड्या

प्राथमिक माहितीनुसार, या पाच मजली इमारतीच्या तळघर आणि पहिल्या दोन मजल्यांवर कपडे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा करण्यात आला होता, तर वरचे मजले निवासासाठी वापरले जात होते. येथे अचानक आग लागली. अग्निशमन दलाला सकाळी ७:०० वाजता या आगीची माहिती मिळाली, ज्यानंतर तातडीने ३० अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. आगीतून जीव वाचवण्यासाठी दोन व्यक्तींनी इमारतीवरून खाली उड्या मारल्या, ज्यात ते जखमी झाले असून त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

१० जणांचा वाचविण्‍यात यश

या दुर्घटनेत डॉक्टरांनी नऊ जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये प्रवेश (३५), कमल (४०), आशू (३२) यांच्‍या तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. आयजीआय (IGI) रुग्णालयात दाखल ३८ वर्षीय महिलेचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. येथे एका पुरुषासह दोन वर्षांच्या चिमुरडीवर उपचार सुरू आहेत. सफदरजंग रुग्णालयात २५ टक्के भाजलेल्या तरुणाला दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण १० जणांना वाचवून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Delhi Building Fire
Pune Hadapsar Slum Fire: हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग; १९ झोपड्या जळून खाक

मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी व्‍यक्‍त केले तीव्र दुःख

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत दंडाधिकारी चौकशीचे (Magisterial Inquiry) आदेश दिले आहेत. तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंह संधू यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Delhi Building Fire
Odisha SCB Medical College fire: ओडिशातील SCB वैद्यकीय महाविद्यालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news