Delhi News: 'आम्हाला स्पर्श केला, घाणेरडे मॅसेज पाठवले..,' मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील १७ विद्यार्थीनींचा लैंगिक छळ; स्वामी चैतन्यानंदवर गंभीर आरोप

दिल्लीतील एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये १७ विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Delhi News
Delhi Newsfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये १७ विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी स्वयंघोषित धर्मगुरू स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी संस्थेचे प्रशासक पी.ए. मुरली यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्वामी चैतन्यानंद हा संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे. ईडब्लूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) शिष्यवृत्ती अंतर्गत PGDM कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर अश्लील मॅसेज पाठवत होता. इतकेच नव्हे, तर त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ४ ऑगस्ट २०२५ रोजी श्री शृंगेरी मठाचे प्रशासक पी.ए. मुरली यांनी वसंत कुंज नॉर्थ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

आरोपीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांकडून विद्यार्थिनींवर दबाव

तक्रारीत म्हटले आहे की, संस्थेतील काही महिला प्राध्यापक स्वामी चैतन्यानंदच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनींवर दबाव टाकत होत्या. यामुळे विद्यार्थिनींना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी एकूण ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असून त्यापैकी १७ जणींनी चैतन्यानंद याच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. विरोध केला असता प्राध्यापकांनी धमकी दिल्याचेही विद्यार्थिनींनी म्हटले आहे.

स्वामी चैतन्यानंद फरार

सध्या स्वामी चैतन्यानंद फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संस्थेच्या तळघरातून स्वामी चैतन्यानंद वापरत असलेली व्होल्वो कार पोलिसांनी जप्त केली आहे. गाडीसाठी युनायटेड नेशन्सचा बनावट डिप्लोमॅटिक नंबर वापरल्याचेही तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news