भारत आवडत नसेल तर इथे काम करु नका!

दिल्ली उच्च न्यायालयाने विकीपीडियाला खडसावले
Delhi Highcourt On Wikipedia
दिल्ली उच्च न्यायालयाने विकीपीडियाला खडसावलेPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.5) विकिपीडियाला चांगलेच खडसावले. विकीपीडियाविरुद्धच्या मानहानी खटल्याप्रकरणी न्यायालयाने हे खडे बोल सुनावले आहेत. तुम्हाला भारत आवडत नसेल तर इथे काम करू नका, सरकारला तुमची वेबसाईट बंद करायला सांगू, असे दिल्ली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला म्हटले.

Delhi Highcourt On Wikipedia
अरविंद केजरीवालांविरोधातील मानहानी खटला रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

एका वृत्तसंस्थेने जुलै २०२४ मध्ये विकिपीडियावर खटला दाखल केला होता. यामध्ये आरोप आहे की, विकिपीडियावर त्या वृत्तसंस्थेचे वर्णन केंद्र सरकारचे प्रचाराचे साधन असे आहे. ते विकिपीडियावरून काढून टाकण्याची मागणी आणि २ कोटी रुपयांचे नुकसान भरपाई वृत्तसंस्थेने केली आहे. वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, विकिपीडिया फाऊंडेशनने वृत्तसंस्थेची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी खोटी आणि बदनामीकारक मजकूर प्रकाशित केला. २० ऑगस्ट रोजी न्यायालयाने विकिपीडियाला वृत्तसंस्थेबद्दलचे पेज संपादित करणाऱ्या तीन सदस्यांची माहिती देण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप करत वृत्तसंस्थेने ५ सप्टेंबर रोजी विकिपीडिया विरोधात अवमान याचिका दाखल केली. अवमान याचिकेवर उच्च न्यायालयाने विकिपीडियाला नोटीस बजावली आहे.

Delhi Highcourt On Wikipedia
सिसोदियांना जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

विकिपीडियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, त्यांचे भारतात युनिट नाही. त्यामुळेच त्यांना हजर व्हायला वेळ लागेल. न्यायमूर्ती नवीन चावला यांनी या युक्तिवादावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. त्यांनी विकिपीडियाच्या प्रतिनिधीला २५ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news