दिव्यांगांना दर महिन्याला ५ हजार पेन्शन देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय

Delhi State News। ६० टक्‍केहून अधिक अंपगत्‍व असणार्‍यांना मिळणार लाभ
delhi state news
दिव्यांगFile Photo
Published on
Updated on

दिल्ली : दिल्ली सरकारने दिव्यांगांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली. त्यामुळे दिव्यांगांना दरमहा एवढी रक्कम देणारे दिल्ली हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. याची घोषणा करताना दिल्लीचे समाजकल्याण मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने दिव्यांगांना जास्तीत जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांचे अपंगत्व ६० टक्क्यांहून अधिक डॉक्टरांनी प्रमाणित केले आहे ते दरमहा ५ हजार रुपये पेन्शनचे लाभार्थी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

कॅबिनेटमध्ये प्रस्‍ताव मंजूर

सध्या दिल्ली सरकार सुमारे १ लाख २० हजार लोकांना पेन्शन देत आहे. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि यूडीआयडी कार्ड बनवले आहे. शासन लवकरच नोंदणी सुरू करणार असून, ही योजना तातडीने लागू करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. मतमोजणीनुसार, दिल्लीत सुमारे २ लाख ३४ हजार ८८२ लोक अपंग आहेत. दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news