NEET Paper Leak Fast Track Courts: नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन

नीट परीक्षा आणि पेपरफुटीशी संबंधित गुन्ह्यांची जलद सुनावणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन केले
NEET Paper Leak Fast Track Courts
NEET Paper Leak Fast Track CourtsPudhari
Published on
Updated on

NEET Paper Leak Fast Track Courts

नवी दिल्ली : नीट परीक्षा आणि पेपरफुटीशी संबंधित गुन्ह्यांची जलद सुनावणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन केले. त्याच्या विशेष न्यायाधीशपदी अनु ग्रोव्हर बालीगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

23 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, बालीगा यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी व सलोखा केंद्रातील न्यायाधीश पदावरून तात्काळ बदली करून राऊस अव्हेन्यू न्यायालय संकुलातील विशेष न्यायालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणांतील आरोपींना जलद आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरात विशेष फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली होती. यानंतर तात्काळ फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. हे न्यायालय सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरमार्गांचा वापर अशा प्रकरणांवरील फौजदारी खटल्यांची विशेष सुनावणी करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news