Delhi Election Result | दिल्लीत सत्तेचा उलटफेर; भाजप सुसाट, 'आप' पिछाडीवर

दिल्लीत कमळ फुलणार?
Delhi Assembly Elections, Delhi Exit Poll Results 2025
दिल्ली निवडणूक निकाल- सुरुवातीच्या कलानुसार, भाजपने बहुमतांची आघाडी घेतली आहे. (File Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज शनिवारी मतमोजणी सुरु आहे. ७० विधानसभेच्या जागांपैकी ३६ जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. सुरुवातीच्या कलानुसार, भाजपने ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्ष २० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने केवळ एका जागेवर आघाडी घेतली आहे.

निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे.

Delhi Election Result | केजरीवाल, सिसोदिया पिछाडीवर

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. येथून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. त्याचबरोबर जंगपुरा येथून माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कालकाजी येथून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी देखील पिछाडीवर पडल्या आहेत. दिल्ली कँट येथून भाजपचे भुवन तंवर आघाडीवर आहेत.

जनकपुरी येथून आपचे उमेदवार प्रवीण कुमार आघाडीवर आहेत. करावल नगर येथून भाजपचे कपिल मिश्रा यांनी आघाडी घेतली आहे.

विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला हॅट्ट्रिक साधता येणार नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढलेल्या भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मागच्या दशकभरापासून एकही आमदार नसलेल्या काँग्रेस पक्षालाही दिल्लीत खाते उघडता येईल, असा अंदाजही एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला.

राजधानी दिल्लीमध्ये अडीच दशकांपासून भाजप सत्तेपासून दूर आहे. भाजपचा सत्तेचा हा दुष्काळ या निवडणुकीत दूर होईल, अशी शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये वर्तवण्यात आली होती.

Delhi Assembly Elections, Delhi Exit Poll Results 2025
भाजपने दिल्लीचे तख्त पालटले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news