Delhi liquor scam : केजरीवालांना दिलासा नाहीच, काेठडीत १२ जुलैपर्यंत वाढ

दिल्‍लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाचा निर्णय
Delhi liquor scam
दिल्‍ली मद्य धोरण प्रकरणी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची मागणी आज (दि.२९) सीबीआयने राऊस अव्हेन्यू न्यायालयाने केली. File Photo

दिल्‍ली मद्य धोरण प्रकरणी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची मागणी आज (दि.२९) सीबीआयने राऊस अव्हेन्यू न्यायालयाकडे केली. न्यायालयाने केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जामीनासाठी अर्ज दाखल करणार

अरविंद केजरीवालांच्‍य वकिलांनी ANIशी बोलताना सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना सुनावण्‍यात आलेली सीबीआय कोठडी आज संपली. त्‍यामुळे त्‍यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने त्‍यांच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची मागणी केली. त्‍यांच्‍या कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्‍यात आली आहे. आता त्‍यांना १२ जुलै रोजी न्‍यायालयात हजर केले जाईल. केजरीवाल यांना मधुमेहाची औषधे, चाचणी किट आणि घरी शिजवलेले अन्न पुरवावे आदी आमच्‍या मागण्‍या न्‍यायालयाने मान्‍य केल्‍या आहेत. सोमवार किंवा मंगळवारी आम्ही जामीन अर्ज दाखल करू.

दिल्‍ली मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने बुधवार, २६ जून रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्‍यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. त्‍यांच्‍या कोठडीत वाढ करण्‍यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने दाखल केली हाेती यावेळी केजरीवालांचे वकील विक्रम चौधरी यांनी सीबीआयच्‍या याचिकेला विरोध केला. सीबीआय आपल्‍या अधिकाराचा गैरवापर करत असल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

Delhi liquor scam
सीबीआय मला बदनाम करत आहे, मी आणि सिसोदिया निर्दोष : केजरीवाल

दिल्‍लीतील कथित मद्य धोरण प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी) २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. अटक कारवाईविरोधात त्‍यांनी उच्‍च न्‍यायालय व सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. १० मे रोजी सर्वोच्‍च न्‍यायालयाने केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच त्‍यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करावे लागेल,असेही स्‍पष्‍ट केले होते. यानंतर ५ जून रोजी अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाने त्‍यांचा अंतरिम जामीन नाकारला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्‍या न्यायाधीश निया बिंदू यांनी गुरुवारी (दि.२०) दुपारी त्‍यांना जामीन मंजूर केला. मात्र या निर्णया विरोधात ईडीने उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली. उच्‍च न्‍यायालयाने या जमीनला स्‍थगिती दिली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news