
सोमवारी दिल्ली येथे झालेल्या स्फोटानंतर नेहमी गजबजलेली दिल्लीने आज तणावपूर्ण शांतता अनुभवली. अनेक चौक महत्वाची ठिकाणी बंदोबस्तामूळे ओस पडली होती.
दिल्लीतील महत्वाच्या नेहरू प्लेस (कॉम्प्युटर मार्केट) भागातील सुरक्षेत वाढ करण्यात आली. पूर्ण वेळ पोलिसांची गस्त आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनलगत असलेल्या जामा मशीद मेट्रो स्थानकावरही शुकशुकाट
लाल किल्ला परिसरातील सुनहरी मशीदचा फोटो, इथेही वर्दळ खूपच कमी आहे.
एरवी पाय ठेवायला जागा नसलेले लाल किल्ल्यासमोरील निर्मनुष्य रस्ते
लाल किल्ला परिसरात अग्निशमन दलाची वाहने पूर्णवेळ उभी आहेत.
लाल किल्ला परिसरातील बहुतांश मार्केट कडकडीत बंद
घटनास्थळापासून विशिष्ट अंतरावर उभे असलेले स्थानिक रहिवासी, दुकानदार
अनेक ठिकाणची मार्केट ओस पडली होती किंवा बंद होती
घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेले जैन मंदिर
लाल किल्ल्यासमोरील परिसरात दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे बॅरीकेटिंग केले आहे. दिल्ली पोलिसांसह, शीघ्र कृती दल आणि अन्य महत्वाची पथके इथे तैनात आहेत.