

Red Fort Metro Station gates opened
नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले लाल किल्ला मेट्रो स्टेशन आता पूर्णपणे उघडण्यात आले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) रविवारी ही घोषणा केली. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणाहून प्रवाशांची वर्दळ दिसू लागली आहे आणि परिस्थिती सामान्य होत आहे. सध्या लाल किल्ला परिसरातील बॅरिकेड्स देखील हटवण्यात आले आहेत. मात्र, स्फोटाचा तपास अजून सुरू आहे.
१० नोव्हेंबरला लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशन जवळ एक मोठा स्फोट झाला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. रविवारी पाच दिवसांनी हे ध्वज पूर्णपणे उघडण्यात आले. यापूर्वी शनिवारी २ दरवाजे उघडण्यात आले होते.
१० नोव्हेंबरला स्फोटानंतर लगेचच डीएमआरसीने एक निवेदन जारी केले होते की, सुरक्षा यंत्रणा स्टेशनला परवानगी देईपर्यंत लाल किल्ला स्टेशन येथून प्रवेश आणि बाहेर पडणे बंद राहील. लाल किल्ला, जामा मशीद आणि चांदणी चौकात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे एक प्रमुख स्टेशन आहे. मागील पाच दिवस हे स्टेशन बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना आणि पर्यटकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.