हवा नाही विष ! दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर

Air Pollution in delhi : रविवारी दिल्लीची हवेची गुणवत्ता "अत्यंत खराब" श्रेणीमध्ये
delhi air pollution
दिल्लीची हवेची गुणवत्ता Pudhari
Published on
Updated on

दिवाळीच्या आसपासच्या दिवसात फटक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत कायम बोललं जातं. पण सध्या दिल्लीने मात्र याबाबतचे सगळे विक्रम मोडले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, रविवारी दिल्लीची हवेची गुणवत्ता "अत्यंत खराब" श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली, या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 382 वर पोहोचला.

या श्रेणीमुळे दिल्लीतील हवेचा दर्जा आता अत्यंत खराब वरुन गंभीर स्थितीमध्ये पोहोचण्याच्या पातळीवर पोहोचला आहे. कचरा किंवा पेंढा जाळण्याचे प्रमाण कमी असूनही हवेने प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. याचा अर्थ दिल्लीच्या प्रदूषणावर बाकीचे घटकही प्रभाव निर्माण करत आहेत.

वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकामाची धूळ हे दिल्लीच्या प्रदूषणामध्ये मोठे योगदान देतात.यातील कण हवेत बराच काळ राहून मानवी श्वासोश्वासावर गंभीर परिणाम करतात. दिल्लीतील हवेची पाहणी करणाऱ्या ४० स्थानकांपैकी डझनहून अधिक स्थानकांनी रविवारपर्यंत 'गंभीर' श्रेणीत प्रवेश केला आहे. त्रासदायक AQI पातळी नोंदवणाऱ्या प्रमुख स्थानांमध्ये आनंद विहार, अशोक विहार, बवाना, द्वारकामधील दोन्ही स्थानके, जहांगीरपुरी, मुंडका, नजफगढ, लाजपत नगर, पटपरगंज, विवेक विहार, रोहिणी, पंजाबी बाग आणि वजीरपूर यांचा समावेश आहे.

स्थानिक प्रदूषणाचे स्रोत, प्रतिकूल हवामानशास्त्रीय परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणात उत्सर्जन यामुळे दिल्लीतील प्रदूषणात आणखी भर पडते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news