

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. येत्या ७-८ फेब्रुवारीला निवडणुकीची घोषणा होऊ शकते. राजधानी दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी २०२५ मध्ये होऊ घातली आहे.
सत्ताधारी आम आदमी पक्षासह विरोधात असलेले काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत प्रामुख्याने दिल्लीत होईल. अन्य काही पक्ष या निवडणुकीत उमेदवार देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही उमेदवार दिल्ली विधानसभेमध्ये असणार आहेत. निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराला भाषणाच्या माध्यमातून सुरुवात केली आहे.