

नवी दिल्ली, : सोमवारी दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे दिल्ली विमानतळावर १२८ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली, तर ८ विमानांचे मार्ग बदलण्यात आले आणि जवळपास २०० विमानांना विलंब झाला. रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये ६४ निर्गमन आणि ६४ आगमन करणारी विमाने रद्द करण्यात आली.
इंडिगोने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला. दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक विमानतळांवर धुक्याची स्थिती कायम आहे. दृश्यमानता कमी झाली आहे आणि परिणामी, सध्या विमानांची वाहतूक सामान्यपेक्षा मंद आहे, ज्यामुळे विलंब होत आहे, असे इंडिगोने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटेल.