Naxal Funding Allegation | अमेरिकन संस्थेकडून नक्षलवाद्यांना १०० कोटी!

Naxal Funding Allegation |
Naxal Funding Allegation | अमेरिकन संस्थेकडून नक्षलवाद्यांना १०० कोटी!AI File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेतील ‘द टिमोथी इनिशिएटिव्ह’ या संस्थेशी लिंक असलेल्या आणि परदेशातून जारी केलेल्या डेबिट कार्डांच्या माध्यमातून भारतात कोट्यवधी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे वळवण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार अंमलबजावणी संचालनालयाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील तपासाचे निष्कर्ष आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवले जाणार असल्याचे ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी सांगितले. यामध्ये फेमा, एफसीआरए आणि यूएपीएसारख्या गंभीर कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा संशय आहे. नक्षलवाद्यांना यातून १०० कोटी रुपये पुरवल्याचा संशय आहे.

‘फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट-इंडिया’ने दिलेल्या एका संशयास्पद व्यवहार अहवालानंतर या तपासाला गती मिळाली. अमेरिकेतील ‘ट्रुईस्ट बँक’ने जारी केलेल्या डेबिट कार्डस्‌चा वापर करून भारतातील बँकिंग नियमांना बगल दिली जात असल्याचे समोर आले. भारतातील विविध राज्यांमधील एटीएमधून दर दोन ते तीन दिवसांनी ७०,००० ते ८०,००० रुपयांची रोख रक्कम वारंवार काढली जात होती. ही काढलेली रक्कम नंतर भारतीय बँक खात्यांमध्ये जमा केली जात होती किंवा डिजिटल पद्धतीने ट्रान्‍स्‍फर केली जात होती. नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या अवघ्या काही महिन्यांत भारतात तब्बल ९२.५५ कोटी रुपये (९९,९५,२४० डॉलर्स) खर्च करण्यात आले.

अमेरिकेतील ‘द टिमोथी इनिशिएटिव्ह’शी संबंधित परदेशी डेबिट कार्डस्‌द्वारे भारतात नियमबाह्य पद्धतीने ९२.५५ कोटी रुपये वळवण्यात आले. या एकूण निधीपैकी तब्बल ६.३४ कोटी रुपयांची रोख रक्कम छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर आणि धामतरी भागात एटीएमद्वारे काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news