चष्म्याशिवाय दिसेल, असा दावा केलेल्या जादुई आय ड्रॉपवर बंदी

PresVu आय ड्रॉपवर बाजारात येण्यापूर्वीच बंदी, कारण काय?
PresVu, DCGI
चष्म्याशिवाय जवळचे स्पष्ट दिसणार असल्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपवर बंदी घालण्यात आली आहे. (File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

चष्म्याशिवाय जवळचे स्पष्ट दिसणार असल्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपवर बाजारात येण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च औषध नियामक ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने PresVu या आय ड्रॉपचे उत्पादन आणि मार्केटिंग परवाना निलंबित केला आहे. या आय ड्रॉपची निर्माती करणारी कंपनी Entod फार्मास्युटिकल्सने आय ड्रॉपबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याचे डीसीजीआयने म्हटले आहे.

PresVu या आय ड्रॉप्समुळे नजरेचा चष्मा घालण्याची गरज भासणार नाही. यामुळे जवळची दृष्टी १५ मिनिटांत सुधारते, असा दावा या ड्रॉपची निर्मिती करणाऱ्या औषध कंपनीने केला होता. त्याला DCGI ने २० ऑगस्ट २०२४ रोजी मंजुरीही दिली होती. ऑक्टोबर महिन्यात हा आय ड्रॉप बाजारात उपलब्ध होणार होता. पण त्यापूर्वीच त्याचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. presbyopia ही डोळ्याची एक स्थिती आहे; ज्यामुळे लोकांना वयानुसार जवळचे दिसणे कठीण होते.

निलंबन कारवाईविरोधात कोर्टात आव्हान देणार

जवळचे दिसण्याची समस्या असलेल्या लोकांसाठी (presbyopia) आता चष्मा घालणे कमी होईल, असा दावा या औषध कंपनीने केला होता. पण त्यांच्या आय ड्रापचा उत्पादन परवाना निलंबित केला आहे. दरम्यान, या कंपनीने निलंबनाच्या कारवाईविरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

आय ड्रॉप्सच्या फायद्याबद्दल अतिशयोक्ती करुन सांगितले

“…सार्वजनिक हित लक्षात घेऊन २० ऑगस्ट रोजी पिलोकार्पिन हायड्रोक्लोराइड ऑप्थॅल्मिक सोल्यूशन यूएसपी १.२५ टक्के चे उत्पादन आणि मार्केटिंगसाठी जारी केलेला परवाना औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० च्या न्यू ड्रग्ज अँड क्लिनिकल ट्रायल्स नियमने २०१९ च्या नियम ८४ च्या तरतुदींनुसार पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.,” असे DCGI राजीव सिंह रघुवंशी यांनी पत्रात म्हटले आहे.

सदर कंपनी मान्यताप्राप्त आय ड्रॉप्सच्या फायद्याबद्दल अतिशयोक्ती करुन सांगत असल्याचे आढळून आल्यानंतर DCGI ने ४ सप्टेंबर रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

PresVu, DCGI
Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news