Dairy Products | दुग्धजन्य पदार्थ मिळणार निळ्या-पांढऱ्या रंगांच्या वेष्टनात

Dairy Products |
Dairy Products | दुग्धजन्य पदार्थ मिळणार निळ्या-पांढऱ्या रंगांच्या वेष्टनात
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दुधाची पिशवी, दह्याचा डबा किंवा पनीरचे पॅकेट विकत घेताना पदार्थांच्या वेष्टनावर नवीन चिन्ह दिसू शकेल. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस्‌ ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने १ जुलै २०२८ पासून सर्व दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर (मिश्र दुग्धजन्य पदार्थांसह) निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे एक प्रमाणित थेंबाचे चिन्ह बंधनकारक केले आहे.

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या ओळखीबद्दल समज मिळावी, यासाठी नवीन नियम आणल्याचे सांगितले जात आहे. दूध, दही आणि पनीर उत्पादनांसाठी नवीन चिन्हाचे राजपत्र ९ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आले आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस्‌ (लेबलिंग अँड डिस्प्ले) रेग्युलेशन्स, २०२० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

पांढऱ्या थेंबाचा आकारही निश्चित

निळ्या चौकोनातील सर्वात लहान ६ मि.मी. लोगोसाठी थेंबाची उंची किमान ४.५६ मि.मी. आणि रुंदी ३ मि.मी. असणे आवश्यक आहे. तर, ८ मि.मी. लोगोसाठी ही किमान ६.०८ मि.मी. उंची आणि ४ मि.मी. रुंदी असेल. तर, १२ मि.मी. लोगोसाठी ९.१२ मि.मी. बाय ६ मि.मी., तर १६ मि.मी. लोगोसाठी १२.१६ मि.मी. बाय ८ मि.मी. थेंबाचा आकार असेल.

नवीन दूध चिन्ह कसे?

पॅकेजिंगचा मुख्य प्रदर्शन भाग १०० चौ.सेें.मी.पर्यंत असल्यास ६ मि.मी.चे चौरस असेल. तर, पॅकेजिंगचा मुख्य भाग १०० चौ.सें.मी.पेक्षा जास्त आणि ५०० चौ.सें.मी.पर्यंत आहे. त्यांच्यासाठी ८ मि.मी. आकार राहील. तर, ५०० चौ.सें.मी.पेक्षा जास्त आणि २,५०० चौ.सें.मी.पर्यंतच्या पॅनेलसाठी १२ मि.मी.चा आकार असेल. याशिवाय, २,५०० चौ.सें.मी.पेक्षा जास्त आकाराच्या पॅनेलसाठी १६ मि.मी.चा आकार निश्चित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.