क्रिप्टो करन्सीच्या सूत्रधाराला केरळात अटक

अमेरिकेच्या विनंतीनुसार केरळ पोलिसांची कारवाई
Crypto currency
क्रिप्टो करन्सीच्या सूत्रधाराला केरळात अटक
Published on
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकेत गॅरन्टेक्स नावाची क्रिप्टो करन्सी चालवणार्‍या लिथुआनियाचे नागरिकत्व घेतलेल्या रशियन वंशाच्या अलेक्सेई बेशिओकोव्ह याला अमेरिकेच्या विनंतीनुसार केरळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याने 96 अब्ज डॉलरची क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज चालवली. त्याद्वारे दहशतवादी गट, अमली पदार्थ तस्कर आणि सायबर गुन्हेगारांना चलन पुरवठा करण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

ही अटक अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एका तीव्र शोधमोहिमेचा भाग आहे. गेल्या आठवड्यात या प्रकरणात मोठी कारवाई झाली. त्या क्रिप्टो एक्स्चेंजवर नियंत्रण मिळवण्यात आले. 26 दशलक्ष इतकी संपत्ती जप्त करण्यात आली आणि बेशिओकोव्ह व त्याच्या एका सहकार्‍याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

अमेरिका करणार प्रत्यार्पणाची मागणी

अमेरिका बेशिओकोव्हचे व्हर्जिनिया येथे प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर हे प्रत्यार्पण यशस्वी झाले, तर आंतरराष्ट्रीय मनी लाँडरिंग नेटवर्कवर कारवाई करण्याच्या लढ्यात मोठे यश मिळेल, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, बेशिओकोव्ह हा रशियामध्ये वास्तव्यास होता; पण तो भारतात का आला होता याचे नेमके कारण समजू शकले नाही. भारतात, केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भारतीय केंद्रीय अन्वेषण विभागाने बेशिओकोव्हला फरार आरोपी म्हणून संबोधले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या प्रवक्त्या निकोल नावास ऑक्समन यांनी अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

मनी लाँडरिंगविरोधी कठोर पावले

बेशिओकोव्हची अटक म्हणजे गुन्हेगारांना रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ही कारवाई जागतिक गुन्हेगारी आणि दहशतवादाला मिळणार्‍या आर्थिक मदतीवर कठोर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा एक भाग आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news