

Jharkhand Encounter : देशातील नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी आपली धडक कारवाई सुरु ठेवली आहे. आज (दि. २६मे) झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील पोलिसांना मोठे यश मिळाले. चकमकीत ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी मनीष यादवला ठार झाला. तर १० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी कुंदर खेरवारला यालाअटक करण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन X.95 स्वयंचलित रायफल देखील जप्त केल्या आहेत.
महुआदनर पोलीस स्टेशन हद्दीतील दौना आणि करमखड दरम्यानच्या जंगलात नक्षलवादी कमांडर मनीष यादव त्याच्या पथकासह फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आणि नक्षलवाद्यांना घेराव घालण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, लातेहारमधील महुआदनर पोलीस स्टेशन हद्दीतील करमखड आणि दौना दरम्यानच्या जंगलात रविवारी रात्री उशिरा ते सोमवार सकाळपर्यंत चकमक सुरु होती. पाच लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी मनीष यादव ठार झाला. तर नक्षलवादी कुंदर खेरवारला याला अटक करण्यात आल्याची माहिती पलामूचे पोलीस महानिरीक्षक वायएस रमेश यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी जेजेएमपी (झारखंड जन मुक्ती परिषद) सुप्रीमो पप्पू लोहारा आणि सब-झोनल कमांडर प्रभात गंझू लातेहार पोलिसांनी चकमकीत मारले होते. पप्पू लोहारावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते आणि प्रभातवर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. आता दोन दिवसांनंतर पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे.