पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 18 फेब्रुवारी 2023 पासून कार्यरत आहेत. राधाकृष्णन यांच्याकडे झारखंड सोबत तेलंगणा राज्याची अतिरिक्त कार्यभार होता. यांची विश्वासार्ह माहिती राष्ट्रपतींच्या कार्यालयाने दिली आहे.
तामिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते आणि झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. कोईम्बतूरमधून ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. ते तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. पक्षनेतृत्वाने त्यांना केरळचे प्रभारीही बनवले होते. ते 2016 ते 2019 पर्यंत ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते.
सीपी राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात एका सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या 16 व्या 1973 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी मध्ये प्रवेश केला. नंतर ते जनसंघात दाखल झाले आणि सक्रिय राजकारणात आले. यानंतर, 1998 च्या कोईम्बतूर बॉम्बस्फोटानंतर, त्यांनी कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक जिंकली. 1998 मध्ये ते दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. तर 1999 मध्ये ते 55 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. तुतीकोरीनच्या व्हीओसी कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले.
सीपी राधाकृष्णन यांची दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणना केली जाते. तामिळनाडू आणि केरळसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या पाच दशकांपासून ते आरएसएस, जनसंघ आणि भाजपशी संबंधित आहेत.