COVID-19 Update : देशात मागील २४ तासांमध्ये ३७८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आज (दि. ९ जून) सकाळी आठवाजेपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६,१३३ वर पोहोचली आहे. मागील ४८ तासांमध्ये केरळ आणि गुजरात राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे.
देशभरात रविवारी (दि. ८ जून) कोरोनाचे ७३९ नवीन रुग्ण आढळले हाेते. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सहा हजारांच्यावर वर गेली होती. सर्वाधिक रुग्णसंख्या केरळ राज्यात असून गुजरात, बंगाल आणि दिल्ली राज्यातील रुग्णसंख्या अनुक्रमे दुसरा, तिसर्या आणि चौथा क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता तयारीचा आढावा घेण्यासाठी रविवारी केंद्र सरकार 'मॉक ड्रिल' घेतले. सर्व राज्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.उपचार सुरु असणार्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ते घरी उपचार घेतल्यानंतर बरे झाले आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून देशात कोरोनामुळे ६५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.