'हे कोर्ट आहे, कॉफी शॉप नाही..' : सरन्‍यायाधीश का संतापले? जाणून घ्‍या सविस्‍तर

निवृत्त न्यायाधीशांविरुद्धच्‍या याचिकेवरील सुनावणीवेळी वकिलांना सुनावले खडेबाेल
Chief Justice  DY Chandrachud
सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूडFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "हे कोर्ट आहे, कॉफी शॉप नाही. मी हे सहन करणार नाही. न्यायाधीशांना प्रतिवादी करून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता? काही तरी प्रतिष्ठा असावी. मला न्यायाधीशाविरुद्ध इनहाउस तपास हवा आहे, अशी मागणी तुम्‍ही करु शकत नाही." अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि. ३० सप्‍टेंबर) सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्या वकिलाला फटकारले. जाणून घेवूया सर्वोच्‍च न्‍यायालयात नेमंक काय घडलं?

काय होते प्रकरण ?

न्यायमूर्ती गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करणारी याचिका २०१८ मध्ये सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल झाली होती. याचिकाकर्ते वकील आहेत. आजच्‍या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे नाव वगळण्याची सूचना केली आहे. 'न्यायाधीशांना प्रतिवादी करून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता? काही तरी प्रतिष्ठा असावी, असेही त्‍यांनी सुनावले.

'हो' शब्दावर सरन्यायाधीश संतापले

सुनावणी वेळी याचिकाकर्ता वकिलांनी 'ये, ये' असा उच्‍चार केला. यावर सरन्‍यायाधीशांनी वकिलांना सुनावले की, प्रश्‍नाला उत्तर देण्‍यापूर्वी Yeah, Yeah नाही Yes म्‍हणा. हे कॉफी शॉप नाही. होय हा शब्‍द मला आवडत नाही. कोर्टात याची परवानगी देता येणार नाही. यावेळी वकिलांनी आपण महाराष्‍ट्राचे असल्‍याचे सांगितले. यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित वकिलांना मराठीत समजावण्याचा प्रयत्न केला.

न्यायाधीशांना प्रतिवादी करून याचिका कशी दाखल करू शकता?

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, 'न्यायाधीशांना प्रतिवादी करून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता? काही तरी प्रतिष्ठा असावी. न्यायमूर्ती रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. भारताच्या सरन्यायाधीश पदावरून ते निवृत्त झाले आहेत. तुम्ही म्हणू शकत नाही की, मला न्यायाधीशाविरुद्ध इनहाउस चौकशी हवी आहे.

आम्ही अशा तपासाचे आदेश देऊ शकत नाही...

सरन्‍यायाधीश चंद्रचूड म्‍हणाले की, गोगोई हे आता निवृत्त न्यायाधीश आहेत. आम्ही अशा तपासाचे आदेश देऊ शकत नाही. यावर याचिकाकर्ता वकिलांनी सांगितले की, 'मी केलेली मागणी योग्‍य आहे. कायदाही माझ्या बाजूने आहे. तत्‍कालीन सरन्‍यायाधीशांनी माझी पुनर्विलोकन याचिका कामगार कायद्यांशी परिचित असलेल्या खंडपीठासमोर मांडण्याची विनंती केली होती; पण तसे झाले नाही. फेटाळण्‍यात आली. यावर सरन्‍यायाधीशांनी चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले की, रजिस्ट्री या याचिकेवर विचार करेल. सध्या तुमच्या अर्जातून न्यायमूर्ती गोगोई यांचे नाव काढले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news