कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा वाद दिल्ली दरबारी

कार्यकर्त्यांकडून राज्यात तीन उपमुख्यमंत्री करण्याची मागणी
Karnataka Congress Official's Meets Rahul Gandi in Delhi
कर्नाटकातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे राहुल गांधींची भेट घेतलीPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात वर्चस्वाचा वाद पेटला आहे. तसेच तो वाद थेट दिल्ली दरबारात पोहचला आहे. शनिवारी (दि.29) दोन्ही नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन आपले बाजू मांडली आहे.

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मिडीयावरील एक्सवर शेअर करून पक्षात सारेच काही आलबेल आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्याचे सिध्दरामय्या यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Karnataka Congress Official's Meets Rahul Gandi in Delhi
Congress and TMC : काँगेस पक्ष ममतादीदींच्या ‘तृणमूल’मध्ये विलीन होणार?

मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधीच डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी (दि.28) सांयकाळी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षातील हालचालींबाबत सार्वजनिकपणे बोलू नका, असे बजावले देखील आहे. कोणी काही बोलल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कर्नाटकात नेतृत्वबदल करून शिवकुमार यांच्यासह तीन उपमुख्यमंत्री बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे नेते आणि पदाधिकारी वेगवेगळी विधाने करीत असून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. वीरशैव-लिंगायत, अनुसूचित जाती आणि जनजाती अथवा अल्पसंख्याक समुदायातील प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री बनविण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Karnataka Congress Official's Meets Rahul Gandi in Delhi
राज्याबाहेरील कन्नडिगांना कर्नाटक पुरवणार सुविधा; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे आदेश

सध्या वोक्कालिगा समुदायातील शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री आहेत. विश्व वोक्कालिगा महासमस्तन मठाचे संत कुमार चंद्रशेखरनाथ स्वामी यांनी गुरूवारी सार्वजनिकपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पद सोडून शिवकुमार यांना संधी देण्याची मागणी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news