

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे आज (दि.15) दिल्लीमध्ये उद्घाटन झाले. सोनिया गांधी नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. त्यांच्यासोबत राहुल गांधीदेखील उपस्थित आहे. पक्षाचा नवीन पत्ता आता 9ए कोटला रोड असेल. पूर्वी काँग्रेसचे मुख्यालय 24 अकबर रोड येथे होते. या उद्धाटन सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेतेमंडळी हजेरी लावली आहे.
नवीन काँग्रेस कार्यालयाच्या तळमजल्यावर डाव्या बाजूला एक उच्च तंत्रज्ञानाचा पत्रकार परिषद कक्ष तयार करण्यात आला आहे. नवीन इमारतीच्या अगदी मध्यभागी स्वागत कक्ष आहे, त्याच्या मागे एक कॅन्टीन बांधलेले आहे. काँग्रेस मीडिया प्रभारी यांचे कार्यालय इमारतीच्या डाव्या बाजूला असेल. यासोबतच टीव्ही वादविवादांसाठी छोटे ध्वनीरोधक कक्ष बनवण्यात आले आहेत. याशिवाय पत्रकार आणि कॅमेरामनसाठी बैठकीच्या खोल्याही बनवण्यात आल्या आहेत. विशेष कार्यक्रमांसाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर डाव्या बाजूला एक हाय-टेक सभागृह बांधण्यात आले आहे. यासोबतच शेतकरी विभाग, डेटा विभाग असे अनेक विभाग निर्माण करण्यात आले आहेत.