हरियाणात काँग्रेसने दिली 'लाडकी बहीण'ची हमी!

विधानसभा निवडणूक जाहीरनाम्‍यात सात प्रमुख घोषणा
Haryana assembly election
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (दि. १८) दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. ANI Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्‍य प्रदेशनंतर महाराष्‍ट्रात महिलांना दर महिन्‍यात अनुदान देणार्‍या बहुचर्चित लाडकी बहिण योजना प्रभाव काँग्रेस पक्षावरही पडला आहे. हरियाणा राज्‍यातील १८ ते ६० वयोगटातील महिलांना दर महिन्‍यात दोन हजार रुपयांचे अनुदान देण्‍याची घोषणा पक्षाने विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्‍यात केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (दि. १८) दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांची प्रमुख उपस्थित होते.

निवडणूक जाहीरनाम्‍यात काँग्रेसने राज्याच्या विकास आणि लोककल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यास उत्तम प्रशासन आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ हरियाणातील नागरिकांना मिळवून देईल. पक्ष राज्यात भ्रष्टाचारमुक्त कारभार सुनिश्चित करेल आणि शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांच्या हितासाठी महत्त्वाची पावले उचलेल, अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.

काँग्रेस जाहीर नाम्‍यातील प्रमुख घोषणा पुढील प्रमाणे : सर्व महिलांना (18-60 वर्षे वयोगटातील) प्रत्‍येक महिन्‍याला दोन हजार रुपयांचे अनुदान, गॅस सिलिंडर 500 रुपयांना, वृद्ध, अपंग आणि विधवा यांना 6000 पेन्शन, सरकारी विभागांमध्ये 2 लाख पक्की भरती करणार, हरियाणाला अमली पदार्थमुक्त करणार, २५ लाखांपर्यंत मोफत उपचार (चिरंजीवी योजना), 300 युनिट मोफत वीज, 100-100 यार्डांचे मोफत भूखंड आणि कायमस्वरूपी घरे देण्याची योजना, शेतकऱ्यांना MSP ची कायदेशीर हमी, शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची तरतूद, ओबीसींची क्रीमी लेयर मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवली, जातनिहाय सर्वेक्षण करणार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news