‘पण नितीन गडकरीजी तुमचे बॉस ऐकणार का’?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : लसीकरण हे कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धामधील सर्वांत मोठे शस्त्र आहे आणि बर्‍याच ठिकाणी लसी नसल्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प आहे. तथापि, यादरम्यान, अनेक राज्यांमधील लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारला सूचित केले आहे की, इतर कंपन्यांनाही देशात लस बनविण्याचे परवाने मिळावेत जेणेकरून उत्पादन वाढू शकेल. मात्र, नितीन गडकरी यांच्या सुचनेचा संदर्भ घेत काँग्रेसने पीएम मोदींवर तोफ डागली आहे. 

अधिक वाचा : कोरोना : जूनअखेर राज्यांना १० कोटी डोसेस मिळणार!

नितीन गडकरींचा तो व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करताना काँग्रेसचे दिग्गज नेते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आणि म्हणाले, 'त्यांचे बॉस ऐकणार का?८ एप्रिल रोजी डॉ. मनमोहन सिंग यांनीही अशीच सूचना केली होती. 

अधिक वाचा : कोरोनावर 2-DG औषध निर्णायक ठरणार? 

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या संदर्भात लिहिले होते की केंद्राने दोन सक्षम लस कंपन्यांचे फॉर्म्युला इतर सक्षम औषधी उत्पादकांना द्यावे जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल. सध्या दोन कंपन्या देशात अँटी-कोरोना लस तयार करत आहेत. कोव्हॅक्सिन लस तयार करणारी भारत बायोटेक आणि कोविशिल्डची निर्मिती करणारी दुसरी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. या दोन्ही कंपन्यांना लस उत्पादनापासून अन्य कंपन्यांनी केलेल्या नफ्यातून रॉयल्टी देता येईल, असे केजरीवाल म्हणाले.

अधिक वाचा : कोरोना : बाबा रामदेवांच्या औषधाला मान्यता नाही; तरीही केंद्रीय मंत्री वाटताहेत 'कोरोनिल'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news