काँग्रेसने दिली अमित शहांविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस

amit shah vs congress| सोनिया गांधींची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
Amit Shah
अमित शहा file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची नोटीस बुधवारी दिली. काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी माजी काँग्रेस अध्यक्षा आणि पक्षाच्या राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत नोटीस दिली.

जयराम रमेश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना लिहिलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, २५ मार्च रोजी अमित शाह यांनी आपत्ती व्यवस्थापन विधेयक, २०२४ वरील चर्चेदरम्यान म्हटले होते की, काँग्रेसच्या राजवटीत फक्त एकाच कुटुंबाचे नियंत्रण होते आणि काँग्रेस अध्यक्ष त्याचाच एक भाग होते. काँग्रेस अध्यक्ष सरकारी निधीचा भाग होते. ते सरकारला काय उत्तर देतील? असे ते म्हणाले होते.

जयराम रमेश म्हणाले की, अमित शाह यांनी सोनिया गांधींचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा स्पष्टपणे सोनिया गांधींकडे होता. त्यांनी सोनिया गांधींवर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्या कारभारात दुर्भावनापूर्ण हेतूने काम केल्याचा आरोप केला. कोणत्याही खासदारावर असे आरोप करणे हे संसदेचा अवमान आणि विशेषाधिकाराचा भंग मानले जाते. गृहमंत्र्यांनी खोटे आरोप केले आणि सोनिया गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे जाणूनबुजून केलेले षड्यंत्र होते, असे रमेश म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध विशेषाधिकार उल्लंघनाची कारवाई सुरू करावी अशी मागणी त्यांनी राज्यसभा सभापतींकडे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news