पुढारी ऑनलाईन डेस्क : उदय भानू चिब यांची भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उदय भानू चिब यांची भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. याआधी बीव्ही श्रीनिवास भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.