जून २०१४ च्या तुलनेत कच्चे तेल अजूनही स्वस्तच, तरी सुद्धा पेट्र्रोलसह डिझेलही ‘अब की बार शंभरी पार’!

Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पेट्रोलनंतर आता डिझेलचे दरही १०० रुपये प्रती लीटरच्या पुढे गेले आहेत. शनिवारी डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये डिझेल १०० रुपये ६ पैसे आहे. त्याचबरोबर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या पाच राज्यांत यापूर्वीच पेट्रोल १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.

अखेर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याचे कारण काय आहे? दरवाढीबाबत सरकार भूमिका काय आहे? यामध्ये केंद्र व राज्य सरकार कर आणि तेल कंपन्यांच्या कमिशनची काय भूमिका आहे? या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला काही मार्ग आहे की नाही? चला जाणून घेऊया…

अधिक वाचा : सीएम ठाकरेंनी फोन करताच पीएम मोदी काय म्हणाले? संजय राऊतांकडून 'रोखठोक' खुलासा!

अखेर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्याचे कारण काय आहे?

दोन मे रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. दोन दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या. गेल्या ३९ दिवसांत दिल्लीतच पेट्रोल ५.५७ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर डिझेल ६.०७ रुपयांनी महागले आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६ रुपये १८ पैसे होती डिझेलची किंमत ८७.०४ रुपयांवर गेली. या काळात किंमती खाली आल्या असा एक दिवसही गेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील या वाढीमागील कारण सांगितले जात आहे. ३ मे रोजी भारतीय बाजारपेठेत प्रती बॅरेल ६५.७१ डॉलर होती. आता त्याची किंमत वाढून ७१ डॉलर प्रती बॅरेल झाली आहे. 

अधिक वाचा : अजब प्यार की गजब कहाणी! प्रियकराने १० वर्षं प्रेयसीला ठेवले कोंडून

दरवाढीबाबत सरकारची भूमिका काय?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सध्या कोणतीही कपात करण्याची संधी नाही, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सांगितले. याला त्याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतींना दिले. प्रधान म्हणाले की, क्रूड आता प्रति बॅरल ७० डॉलरच्या पुढे गेले आहे.

तथापि, सरकारचे स्वतःचे आकडे सांगतात की जेव्हा मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०९ डॉलरवर पोहोचली होती. त्यावेळी एक लिटर पेट्रोलची किंमत ७० ते ७२ रुपयांच्या दरम्यान होती. किंमती वाढतात तेव्हा आणखी एक युक्तिवाद केला जातो. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य. हा मुद्दा जर आपण पाहिला तर जून २०१४ मध्ये एका डॉलरची किंमत ५८.८१ रुपये होती. या अर्थाने, त्यावेळी क्रूड ६ हजार ३२६ रुपये १९ पैसे प्रति बॅरल होते. त्याचबरोबर आज क्रूडची किंमत प्रति बॅरल ५ हजार १९९ रुपये ४६ पैसे आहे. म्हणजेच जून २०१४ च्या तुलनेत आजही क्रूड प्रति बॅरल एक हजार रुपयांहून अधिक स्वस्त आहे.

अधिक वाचा : दिशा पटानी : फक्त पाचशे रुपये घेऊन मुंबईत आलेली जेव्हा मुंबईत ५ कोटींचे घर घेते..!

जून २०१४ मध्ये पेट्रोलच्या एका लिटरवरील एक्साईज शुल्क साडे नऊ रुपये होते तर डिझेलवर ते साडे तीन रुपये होते. सध्या ते चार ते दहा पट वाढले आहे. आज एक लिटर पेट्रोलवर ३२.९ रुपये आणि डिझेलवर ३१.८ रुपये एक्साईज ड्युटी  घेतली जात आहे. 

त्याचप्रमाणे राज्यांनीही गेल्या पाच वर्षात विक्रीकर आणि व्हॅट वाढविला आहे. १६ जून २०१७ पासून देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. तेव्हापासून केंद्र आणि राज्यांनी आपापल्या करांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. हे दिल्लीतील पेट्रोल दराच्या उदाहरणावरून समजू शकते.

अधिक वाचा :  सैन्याच्या शौर्यगाथा आता होणार सार्वजनिक

गेल्या तीन वर्षांत पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. जर वाढ झाली असेल तर केंद्र आणि राज्य सरकारच्या करामध्ये. दिल्लीत केंद्रीय करात सर्वाधिक वाढ झाली आहे. जर आपण इतर राज्यांविषयी बोललो तर संबंधित राज्यातील पेट्रोलची किंमत त्या राज्यांच्या कर आणि वाहतुकीसह कमी-अधिक प्रमाणात आहे.

जसे राजस्थान सरकार सर्वाधिक कर वसूल करते, म्हणून पेट्रोल डिझेलने राजस्थानमध्ये प्रथम शतक ठोकले. त्यातही श्री गंगानगरपासून तेल प्रकल्प अंतर सर्वाधिक आहे. म्हणून, करासह, वाहतुकीवरील सर्वाधिक खर्च येथे येतो. म्हणूनच राजस्थानमध्येही श्री गंगानगरमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे.

अधिक वाचा : २८० किलोंचा पोषाख घालणारे महाराणा प्रताप यांच्याबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news