Cockroach Janta Party Protest | कॉक्रोच जनता पार्टीचे हैदराबाद, बंगळुरात आंदोलन

Cockroach Janta Party Protest |
हैदराबाद : कॉक्रोच जनता पार्टीतर्फे येथे झालेल्या आंदोलनात बोलताना सोनम वांगचूक. -
Published on
Updated on

बंगळूर/हैदराबाद; वृत्तसंस्था : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मूल्यमापन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततांविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) या संघटनेने रविवारी बंगळूरमध्ये आंदोलन केले. मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही सहभाग नोंदवला. हातात फूल घेऊन ते आंदोलकांमध्ये उभे राहिले होते. पावसापासून बचावासाठी छत्र्या घेऊन आलेल्या आंदोलकांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात काही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’तर्फे गेल्या नऊ दिवसांत देशातील सहा शहरांमध्ये आंदोलन झाले आहे.

हैदराबादमध्ये वांगचुक यांचे भाषण

हैदराबादच्या धरना चौक येथे झालेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी स्पष्ट केले की, हा कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्याचा किंवा सत्तेच्या पदांसाठीचा संघर्ष नाही. वांगचुक म्हणाले, “हा देशातील युवक आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील जागृतीचा लढा आहे. भारत भीतीमुक्त, द्वेषमुक्त आणि प्रत्येक नागरिकाला समान स्वातंत्र्य देणारा देश व्हावा, ही या आंदोलनामागची भूमिका आहे. देशातील शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्थेची पायाभूत रचना अधिक मजबूत करण्याचा त्यामागचा व्यापक उद्देश आंदोलनामागे आहे. यासाठी भविष्यात सविस्तर आराखडा तयार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news