"मी तुमच्‍या पाया पडतो..." : मुख्‍यमंत्री नितीश कुमारांनी IAS अधिकार्‍यासमाेर जाेडले हात

पाटणा येथील उद्घाटन कार्यक्रमाचा व्‍हिडिओ व्‍हायरल
Nitish Kumar
मी तुमच्‍या पाया पडतो, कृपया काम वेळेवर पूर्ण करा, अशा शब्‍दांमध्‍ये बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमारांनी उद्घाटन कार्यक्रमात आयएएस अधिकार्‍याला विनंती केली.File Photo

पाटणामधील कांगणा घाटापर्यंतच्‍या विस्‍तार कामाला गती द्‍या. मी तुमच्‍या पाया पडतो, कृपया काम वेळेवर पूर्ण करा, अशा शब्‍दांमध्‍ये बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमारांनी उद्घाटन कार्यक्रमात आयएएस अधिकार्‍याला विनंती केली. पाटणा येथे गायघाट ते कनघनघाट या जेपी गंगा पथाच्या भागाचे उद्घाटन कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. यावेळी नितीश कुमार यांच्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हाही घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेचा व्‍हिडिओ तुफान व्‍हायरल होत आहे.

Nitish Kumar
‘तुम्‍हाला हिंदी भाषा समजली पाहिजे’ : नितीश कुमार ‘द्रमुक’ नेत्‍यावर भडकले

व्‍हायरल झालेल्‍या व्हिडिओमध्‍ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी एका अधिकाऱ्याच्या पायाला हात लावताना तयारीत दिसत आहेत. यावेळी नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही विचाराल तर आम्ही तुमच्‍या पाया पडू शकतो. काय गरज आहे ते सांगा. तुम्हाला सरकारला कर भरावा लागेल. या वर्षी पूर्ण करा. अशी विनंती केली. अचानक घडलेल्‍या या प्रकाराने अधिकारी ओशाळला. नितीशकुमार यांनी नंतर संबंधित आयएएस अधिकाऱ्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. या पुलाचे काम या वर्षअखेरीस पूर्ण होईल, असे आश्वासन त्‍यांना देण्‍यात आले,

Nitish Kumar
नितीश कुमार, तेजस्‍वी यादव एकाच विमानाने दिल्‍लीला रवाना

नितीश कुमार म्हणाले की, कांगणा घाटाच्‍या विस्‍तार कामामुळे उत्तर बिहारमधील लोकांना पाटण्याला येणं खूप सोईचं होणार आहे. त्यामुळेच हा पूल बांधला जात आहे. पूर्वी हा पूल बख्तियारपूरपर्यंत बांधला जात होता. उत्तर बिहारच्या विविध भागांना पाटण्याशी जोडण्यासाठी आम्ही अनेक पूल बांधत आहोत. हा पूल फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असे आम्हाला यापूर्वी सांगण्यात आले होते, मात्र त्याला उशीर झाला. त्यामुळे आणखी विलंब करू नये, असे आम्ही सर्वांसमोर सांगितले आहे. त्यावर संबंधित अधिकारी म्हणाले की, या पुलाचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल. या घटनेचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने बिहारमध्‍ये नितीश कुमारच्‍या विशेष विनंतीची चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news