

Devendra Fadnavis Meets Bhushan Gavai
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची राजधानी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीशांना महाराष्ट्र विधिमंडळात सर्वपक्षीय सत्कार समारंभासाठी तसेच भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यान देण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले. निती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर होते.