Cigarette Price Hike | सिगरेट सोडून आता बीडी ओढायची का? सिगरेटच्या दरवाढीवर नेटीझन्सचे भन्नाट मीम्स पाहून हसू आवरणार नाही!

तंबाखूजन्य पदार्थांवर 40 टक्के जीएसटी, मात्र बीडीसाठीच्या तेंदू पानांवर केवळ 5 टक्के जिएटी
Cigarette Price Hike
सिगरेटच्या दरवाढीवर नेटीझन्सचे भन्नाट मीम्स
Published on
Updated on

Budget 2026 |आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2026 चे बजेट लोकसभेत मांडले. या बजेटमध्ये करप्रणालीमध्ये कोणतेही बदल केले नाहीत पण काही वस्तूंच्या किंमती मात्र वाढवल्या आहेत. या बजेटवर सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस पडत आहे. यामध्ये तंबाखू व सिगरेटच्या निर्णयावर खूप चर्चा होत आहे. यामध्ये सिगरेटच्या किमती वाढल्या आहेत. पण बिडीच्या किमती मात्र आहे तशाच राहिल्या आहेत. याचा संदर्भ घेत भन्नाट मीम्स् रिल्स व्हायरल होत आहेत.

तंबाखूजन्य पदार्थांवर 40 टक्के जीएसटी वाढ पण बिडी होणार स्वस्त

सध्याचा 28 टक्के जीएसटी आणि नुकसानभरपाई उपकराऐवजी 40 टक्के जीएसटी तंबाखूजन्य पदार्थांवर लागू केला जाईल. सोबत तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर स्वतंत्र उपकर आकारला जाईल. तसेच सिगरेटच्या वेगवेगळा प्रकारानुसार करवाढ करण्यात आली आहे. तर बीडी वळण्यासाठी वापरली जाणारी तेंदूपत्तीच्या पानांवरील जीएसटी 18 टक्के होती ती घटवून 5 टक्क्यांवर आणली आहे. यामुळे बीडी स्वस्त होणार आहे

याची दखल घेत नेटकऱ्यांनी भन्नाट आयडीया लावून मीम्स तयार केले आहेत. तसेच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीडी व सिगरेट दोन्हीही आरोग्यासाठी हानीकारक आहेत मग या करामधून बीडीला का वगळले गेले असे प्रश्न विचारले जात आहेत.

Cigarette Price Hike
Tobacco tax : आजपासून तंबाखू, सिगारेट महागणार

अनेकांनी मीम्स् मधून मत व्यक्त केले आहे. यात धुरंधर मधला रणविर सिंग सिग्रेट ओढत असताना रडताना दाखवला आहे. एका ठिकाणी राजपाल यादव याचा फोटो शेअर करत सिग्रेटचे पाकीट दाखवले आहे व संदेश दिला आहे. बघुया काही व्हायरल मीम्स....

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news