चीनच्या चारशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ‘ईडी’कडून पर्दाफाश

ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपद्वारे गंडा
China's 400 crore rupees scam exposed by 'ED'
चीनच्या चारशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा ‘ईडी’कडून पर्दाफाशPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेला हादरे देण्यासाठी चीनने रचलेला कट सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) उधळून लावला आहे. तपास यंत्रणेने चिनी नागरिकांकडून 25 कोटी रुपये जप्त केले असून, फिविन नामक गेमिंग अ‍ॅपद्वारे भारतातून 400 कोटी रुपये चीनमध्ये पोहोचल्याचे ‘ईडी’च्या तपासातून समोर आले आहे. काही चिनी नागरिकांची क्रिप्टो खाती ‘ईडी’ने गोठविली आहेत. चीनचे हे अ‍ॅप दीर्घकाळापासून भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Summary
  • चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती ‘ईडी’ने गोठविली

  • क्रिप्टो चलन बिहारमध्ये रूपांतरित झाल्याचे उघड

  • भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचे ‘ड्रॅगन’चे षड्यंत्र

China's 400 crore rupees scam exposed by 'ED'
मुडा घोटाळा प्रकरणी CM सिद्धरामय्यांना कर्नाटक हायकोर्टाचा दणका

कोलकात्यात यापूर्वीच छापेमारी

काही दिवसांपूर्वीच ‘ईडी’ने या गेमिंग अ‍ॅपच्या विरोधात देशभर छापे टाकले होते. यादरम्यान, ‘ईडी’ने अनेक भारतीय नागरिकांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीदरम्यान या गेमिंग अ‍ॅपद्वारे भारतातून 400 कोटी रुपये चीनमध्ये कसे पाठवण्यात आले होते, हे उघड झाले आहे. या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन बेटिंग आणि गेमिंग फसवणूक केल्याप्रकरणी ‘ईडी’ने आतापर्यंत चारजणांना अटक केली आहे. याप्रकरणी 16 मे 2023 रोजी कोलकाता येथे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन गेमर्सकडून गोळा केलेले पैसे काही व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. त्या बदल्यात अ‍ॅपमालक त्यांना रिचार्जसाठी कमिशन देत होते. ओडिशाचे रहिवासी अरुण साहू आणि आलोक साहू यांनी रिचार्ज करणार्‍या व्यक्ती म्हणून काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांच्या बँक खात्यात आलेले पैसे क्रिप्टो चलनात रूपांतरित केले आणि नंतर ही रक्कम चिनी नागरिकांच्या वॉलेटमध्ये जमा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

China's 400 crore rupees scam exposed by 'ED'
Thane News | दहा अधिपरिचारिकांच्या नियुक्तीचा घोटाळा

पाटण्यातील अभियंत्याने मदत केल्याचे उघडकीस

बिहारमधील पाटणा येथील अभियंता चेतन प्रकाश याने संबंधितांना रुपयांचे रूपांतर क्रिप्टो करन्सीमध्ये करण्यात मदत करून मनी लाँडरिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जोसेफ स्टॅलिन नावाच्या आणखी एका व्यक्तीने गांसू प्रांतातील पाय पेंग्युन नावाच्या एका चिनी नागरिकाला त्याच्या स्टुडिओ 21 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सह-संचालक बनण्यास मदत केली. जोसेफ हा चेन्नईचा रहिवासी असल्याचे ‘ईडी’च्या तपासात स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news