पुढारी ऑनलाईन डेस्क : चवीने खाणार्यांना आपण खवय्या म्हणतो. पदार्थ शाकाहारी असो की मासांहारी खवय्ये तुम्हाला सर्वत्रच पाहायला मिळतात. अशाच खवय्यासाठी कोईम्बतूर येथे एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केवळ ३० मिनिटांमध्ये ६ फ्लेट बिर्याणी खाणार्या १ लाख रुपयांचे बक्षीस हॉटेलने जाहीर केले हाेते. या स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी खाद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली.
कोईम्बतूर येथील फूड एक्सप्रेस ट्रेन हॉटेलमध्ये अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 30 मिनिटांत 6 प्लेट बिर्याणी खाणाऱ्यांना 1 लाख रुपये जिंकता येतील, असे हॉटेल व्यवस्थापनाने जाहीर केले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाद्यप्रेमींनी बुधवारी हॉटेलमध्ये माेठी गर्दी केली हाेती.
फूड एक्सप्रेस ट्रेन हॉटेल नुकतेच कोईम्बतूर रेल्वे स्टेशन कॅम्पसमध्ये सुरु झाले आहे या हॉटेलने आयाेजित केलेल्या अनोख्या स्पर्धेसाठी खाद्यप्रेमींनी माेठी गर्दी केली. हॉटेलच्या मालकांनी सांगितले की, बिर्याणीच्या 6 प्लेट्स खाईल त्याला 1 लाख रुपये, चार प्लेट खाईल त्याला 50 हजार तर 3 प्लेट २५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 400 लोकांनी नोंदणी केली हाेती, असेही त्यांनी ANIशी बोलताना सांगितले.