Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघातात १३ ठार

रायपूर-बालोदाबाजार रस्‍त्‍यावर मिनी ट्रक आणि ट्रेलरच्या धडक, १२ जखमी
Chhattisgarh Road Accident
छत्तीसगडमध्‍ये रविवारी रात्री झालेल्‍या भीषण अपघातात १० जण ठार झाले.File Photo
Published on
Updated on

Chhattisgarh Road Accident : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. यामध्‍ये 13 जण ठार झाले. १२ जण जखमी झाले असून, त्‍यांच्‍यावर जवळच्‍या रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्‍ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना ही दुर्घटना झाली.

IANSने दिलेल्‍या वृत्तानुसार, रायपूर-बालोदाबाजार रस्‍त्‍यावरील सारागावजवळ मिनी ट्रक आणि ट्रेलर यांच्‍या समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत १3 जणांचा मृत्‍यू झाला तर १२ जण जखमी झाले. मृत आणि जखमी हे चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. रायपूरच्‍या पोलिसांनी म्‍हटलं आहे की, "चटौड गावातील काही लोक छठ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाणा बनारसी येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते परतत होते. रायपूर-बालोदाबाजार रोडजवळ हा अपघात झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news