Chennai: ३ दरवाजे तोडले, अलार्म बंद केले आणि CCTV कॅमेऱ्यांवर स्प्रे-पेंट मारले... चेन्नईतील मंदिरातून मौल्यवान मूर्तीची चोरी

चेन्नईपासून सुमारे ६० किलोमीटर दक्षिणेला मदुरंतकमजवळ डोंगरावर असलेल्या एका मंदिरातून भगवान मुरुगन यांची पाचूची अतिशय मौल्यवान मूर्ती चोरीला गेली.
Emerald Murugan idol Chennai temple
Emerald Murugan idol Chennai temple File photo
Published on
Updated on

Chennai temple theft

चेन्नई : चेन्नईपासून सुमारे ६० किलोमीटर दक्षिणेला मदुरंतकमजवळ डोंगरावर असलेल्या एका मंदिरातून भगवान मुरुगन यांची पाचूची अतिशय मौल्यवान मूर्ती चोरीला गेली. मंगळवारी रात्री चोरट्यांनी मंदिरातील तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था भेदली. सुरक्षा अलार्म बंद केल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर पेंट स्प्रे करून मूर्ती लंपास केली.

ही चोरी पेरुंगकरनई गावातील श्री मरगथा बाला दंडायुधपाणी मुरुगन मंदिरात झाली. हे मंदिर भाविकांमध्ये ‘नाडू पलानी’ या नावाने ओळखले जाते. मंदिरातील मुख्य देवतेची मूर्ती २.२५ फूट उंच असून ती पूर्णपणे पाचूपासून बनविलेली आहे. ही मूर्ती म्हैसूरहून आणून २००८ मध्ये मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली होती.

Emerald Murugan idol Chennai temple
kolhapur Crime News | दीड महिन्यात पाच घरफोड्या; दोघांना अटक

मंदिराच्या सुरक्षेची चोरट्यांना होती माहिती?

मूर्तीची मोठी किंमत लक्षात घेता गर्भगृहाकडे जाणारा मार्ग तीन मजबूत सुरक्षा दरवाजे आणि लोखंडी शटरने सुरक्षित करण्यात आला होता. तसेच कोणी अनधिकृतपणे प्रवेश केल्यास अलार्म वाजेल, अशी यंत्रणाही बसविण्यात आली होती. मंदिराच्या परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. पोलिसांना संशय आहे की, चोरट्यांच्या टोळीला मंदिराची रचना आणि सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण माहिती होती. भाविकांच्या वेशात मंदिराची पाहणी करून त्यांनी ही माहिती मिळविली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका विशाल मूर्तीवर चढून मागील दरवाजापर्यंत प्रवेश केला. त्यानंतर ते गर्भगृहाच्या दिशेने गेले.

तीन स्तरांची सुरक्षा कशी भेदली?

चोरट्यांनी लोखंडी सुरक्षा असलेले तीन दरवाजे पार करून गर्भगृहात प्रवेश केला. मूर्ती तिच्या चौथऱ्यावरून काढण्यापूर्वी त्यांनी सुरक्षा अलार्मचे कनेक्शन तोडले. त्यामुळे अलार्म वाजला नाही. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर पेंट स्प्रे करण्यात आला, जेणेकरून त्यांच्या हालचाली आणि ओळख कॅमेऱ्यात नोंदवली जाऊ नये.

चोरटे रात्री १.३० वाजता मंदिरातून पसार

मूर्ती घेऊन चोरटे रात्री सुमारे १.३० वाजता मंदिरातून पसार झाले. सुरक्षा यंत्रणा ज्या पद्धतीने निष्क्रिय करण्यात आली, त्यावरून चोरट्यांना मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेची आधीपासूनच माहिती असावी, असा पोलिसांचा संशय आहे. रात्रीच्या वेळी मंदिरात केवळ एक सुरक्षा रक्षक तैनात होता. तो तळमजल्यावर गस्त घालत होता.

सकाळी उघडकीस आली चोरी

मंदिरातील चोरी बुधवारी सकाळी उघडकीस आली. पुजारी आणि मंदिराचे प्रशासक मंदिरात पोहोचल्यानंतर मुख्य मूर्ती गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ चिथामूर पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मंदिराची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने गर्भगृह आणि परिसरातून बोटांचे ठसे तसेच इतर पुरावे गोळा केले आहेत. तपासासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चोरट्यांचा शोध घेणे, चोरीला गेलेली मूर्ती परत मिळवणे आणि या प्रकरणात मंदिरातीलच कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात मंदिरातील पुजारी रात्री सुरक्षा अलार्म सुरू करणे विसरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, या चोरीमागे आंतरराज्यीय टोळीचा सहभाग आहे का किंवा एखाद्या संघटित मूर्ती तस्करीच्या नेटवर्कने ही चोरी केली आहे का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Emerald Murugan idol Chennai temple
Crime News : न्यू विश्वास ज्वेलर्स चोरी प्रकरण : सोलापूरच्या टोळीचा पर्दाफाश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news