झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंपई सोरेन यांचा भाजपप्रवेश निश्चित

Champai Soren joins BJP | ३० ऑगस्ट रोजी रांची येथे पक्षप्रवेश
Champai Soren joins BJP
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंपई सोरेन यांचा भाजपप्रवेशFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: झारखंड विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबरोबर होणार आहे. या निवडणुकीच्या अगोदर झारखंडमध्ये भाजपने पक्ष मजबूत करायच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन ३० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रांची येथे हा पक्षप्रवेश (Champai Soren joins BJP) होईल. यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितले.

'या' कारणामुळे चंपई 'झामुमो'वर सोरेन नाराज

झारखंडमधील कथित जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री चंपई सोरेन यांची वर्णी लागली. मात्र, हेमंत सोरेन यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यावर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वतःकडे घेतली. यामुळे चंपई सोरेन त्यांच्या पूर्वीच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षावर नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीनंतर भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या. दरम्यान त्यांनी दिल्ली दौरा केला. मात्र, चंपई सोरेन यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा नाकारल्या होत्या.

शाह यांच्यासोबतच्या बैठकीत पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला

अखेर सोमवारी (२६ ऑगस्ट) रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत चंपई सोरेन यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला निवडणुकीत आदिवासी चेहरा मिळाला आहे. याचा फायदा सत्ताधारी जेएमएम विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजप घेणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news