फेंगल चक्रीवादळामुळे झालेले नुकसानImage Source X
राष्ट्रीय
फेंगल चक्रीवादळामुळे बाधित तामिळनाडूला केंद्राकडून ९४४ कोटी रुपये मंजूर
Fengal cyclone News | राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून अतिरिक्त आर्थिक सहाय्य
नवी दिल्ली : फेंगल चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी तामिळनाडूला मदत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तामिळनाडू सरकारला ९४४ कोटी रुपये देण्यास गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे प्रभावित तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पाँडीचेरी येथील नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी काही केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहेत. या पथकांचे मूल्यांकन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपत्तीग्रस्त राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून अतिरिक्त आर्थिक सहाय्य मंजूर केले जाईल. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने या वर्षी २८ राज्यांना जवळपास २२ कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

