

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी बुधवारी (दि. 9) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांचा निषेध करण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, टपाल आणि वाहतूक यासारख्या सार्वजनिक सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजित कौर यांनी सांगितले की, या बंदमध्ये 25 कोटींहून अधिक कामगार सहभागी होण्याची अपेक्षा आहे.