Tax Distribution | केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी
Tax Distribution | केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण
Tax Distribution | केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण
Published on
Updated on

नवी दिल्ली : राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने शनिवारी सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता विपरीत केला. राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 

केंद्र शासनाने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळण्यास आणि निधी नियोजन अधिक सक्षमपणे करण्यास मदत होणार आहे.

Tax Distribution | केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण
LPG Gas | व्यावसायिक वापराचे तसेच ५-किलोच्या 'फ्री ट्रेड' एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, विमान इंधन महागले 

 महाराष्ट्राला प्राप्त ७ हजार 22 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.

उत्तर प्रदेशला सर्वाधिक निधी

सर्वाधिक १९ हजार २०८ कोटी रुपये उत्तरप्रदेशला जारी करण्यात आले. बिहारसाठी १० हजार ८४५ कोटी, मध्यप्रदेशासाठी ८ हजार १० कोटी, पश्चिम बंगालसाठी ७ हजार ८६६ कोटी रुपये निधी जारी करण्यात आला. कर्नाटकसाठी ४ हजार ५०४ आणि गोव्यासाठी ३९८ कोटी रुपये निधी जारी करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news